मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Ration Card | कोरोनाच्या महामारीत (Coronavirus) अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, कोरोनाच्या महामारीत केंद्र सरकारकडून (Central Government) सर्वसामान्यांना मोफत धान्याचा पुरवठा करण्यात आला. दरम्यान यानंतर सरकारने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) ही योजना काही राज्यात राबवली. अन्य राज्यातील रेशन कार्डवरही मोफत रेशन (Free Ration) दिलं जात असल्याने तेथील रेशन कार्डधारकांना थोडाफार दिलासा मिळाला.
आता दिल्लीमध्येही (Delhi) दुसऱ्या राज्यातल्या रेशन कार्डधारकाला सुद्धा मोफत धान्य मिळण्यास सुरुवात झालीय. वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातल्या अनेक राज्यांमध्ये मोफत रेशन देत आहे. दिल्ली-एनसीआर मध्येही ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना लागू झाल्यानंतर इतर राज्यांतल्या नागरिकांनाही मोफत रेशन मिळण्यास सुरुवात झालीय. याशिवाय यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड या राज्यांत रेशन कार्ड नसतानाही मोफत रेशन दिले जात आहे.
कसं मिळणार धान्य?
‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना अंतर्गत अन्नधान्याचे वितरण आता सर्व ई-पीओएसद्वारे केलं जात आहे.
या अंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड (Ration Card) नसतानाही मोफत रेशन मिळणार आहे. परंतु, यासाठी तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card) किंवा बँकेशी लिंक (Link To The Bank) करणं बंधनकारक आहे.
याशिवाय, दिल्ली सरकारने (Government of Delhi) अशी सुविधा दिली आहे की, तुमची प्रकृती ठीक नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही रेशन दुकानात जाऊ शकत नसाल, तर तुमच्या जागेवर म्हणजे तुमच्या कार्डवर घरातली इतर कोणतीही व्यक्ती रेशन उचलू शकते.
Web Title :- Ration Card | now even if there is no ration card
ration will be available for free know the process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Rains | आगामी 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’
Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध
Gold Price Today | सोनं पुन्हा 52 हजाराची पातळी गाठणार ? सध्या बाजारात सोन्याचा भाव किती? जाणून घ्या