Gold Price Today | सोनं पुन्हा 52 हजाराची पातळी गाठणार ? सध्या बाजारात सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Gold Price Today | मागील एक ते दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. याच घसरणीने सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी दिसून आली. सध्या सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याचे भाव वधारले असल्याचे दिसते. तसेच चांदीच्या दरात देखील चढउतार झाल्याचे पाहायला मिळते. सध्या भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,535 रुपये आहे. तर, सोन्याच्या दरात वाढ होतं सोनं 52 हजाराची पातळी गाठणार का ? अशी चर्चा बाजारात आहे.

काल देखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. काल 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,327 रुपये होता.
तर चांदीचा दर 65,130 रुपये होता. असं करत सोन्याचा भाव 52,000 जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गुंतवणूकदारांमुळे त्याची किंमत झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे.
आगामी काही दिवसांत लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने सोन्याची मागणीही वाढणार असून, यामुळे देखील सोन्याचा दर वाढताना दिसत आहे.

”बाजारामधील तेजीमुळे आगामी 12 ते 15 महिन्यांत सोन्याची खरेदी वाढू शकते आणि त्यामुळे सोन्याचा दर प्रति औंस 2 हजार (सुमारे 1.48 लाख रुपये) झाला आहे.
यामुळे सोने नवीन उच्चांक गाठू शकते.

1 औंस म्हणजे 28.34 ग्रॅम. त्यानुसार 10 ग्रॅम सोन्याचा दर 52,500 रुपयांच्या वर जाऊ शकते,” अशी माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (Commodity And Currency Research) नवनीत दमानी (Navneet Damani) यांनी दिली.

Web Title :- Gold Price Today | Gold Silver Price Today sonya chandi che dar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vitamin Deficiency Signs and Symptoms | सावधान ! ‘व्हिटॅमिन -ए’च्या कमतरेमुळे होऊ शकतात गंभीर आजार, दुर्लक्ष करू नका हे लक्षण

Disadvantages Of Sleeping Empty Stomach | सावधान ! उपाशी पोटी झोपणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक, होते ‘हे’ नुकसान; जाणून घ्या

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात सरी

SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज

CM Uddhav Thackeray | जय महाराष्ट्र ! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव

SSC HSC Exam 2022 | दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीरGold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव

Leave A Reply

Your email address will not be published.