Maharashtra Rains | आगामी 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’
मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Maharashtra Rains | राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून पाऊसाने हजेरी लावली आहे. ऐन कडाक्याच्या थंडीत (Cold) पाऊस कोसळल्याने थंडीचा कडाका अधिकच जाणवला. अवकाळी पावसाने पिकांचे अधिक नुकसान झाल्याने शेतकरी (Farmers) चिंतेत पडला आहे. दरम्यान पुन्हा एकदा अवकाळीचा तडाका राज्याला (Maharashtra Rains) लागण्याची शक्यता आहे. ढगांचा तसा घोंघावत दिसत असल्याने आगामी 24 तासात अरबी समुद्रात (Arabian Sea) वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे.
► Fairly widespread/widespread light/moderate rainfall very likely over Northeast India during 23rd-25th January. Isolated thunderstorm with lightning very likely over the region during next 3 days and isolated hailstorm on 23rd January.
— India Meteorological Department (@Indiametdept) January 22, 2022
कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात अशा भागात पाऊस (Maharashtra Rains) बरसणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज (शनिवारी) मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासून या भागामध्ये ढगाळ वातावरण झालं आहे. या कारणामुळे आगामी 3 ते 4 तासांत संबधित तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. तसेच, दक्षिण गुजरात आणि लगतच्या मध्य प्रदेशातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली आहे. (Maharashtra Rains)
दरम्यान, आगामी 24 तासासाठी उत्तर आणि लगतच्या मध्य आणि पश्चिम
अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा फटका गुजरात किनारपट्टीलाही बसण्याची शक्यता आहे.
आगामी 24 तास याचा परिणाम जादा जाणवणार आहे. दरम्यान, उद्या महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा (Maharashtra Rains) जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या (रविवारी) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, 23 जानेवारीनंतर राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका वाढणार आहे. तसेच, किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
Web Title :- Maharashtra Rains | gusty wind in arabian sea imd give alert to fishermen rain possibilities in pune mumbai maharashtra rains news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध
Home Remedies To Stop Hiccups | उचक्या थांबिण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती ट्रिक्स, जाणून घ्या
Gold Price Today | सोनं पुन्हा 52 हजाराची पातळी गाठणार ? सध्या बाजारात सोन्याचा भाव किती? जाणून घ्या