Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Heart Patients Winter | heart patients should take more care in winter here are the reasons

एन पी न्यूज 24  ऑनलाइन टीम – Heart Patients Winter | हिवाळा सुरू झाला की अनेक आजार वाढतात. हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास वृद्ध लोक आणि लहान मुलांना होतो. सर्दी झाल्यानंतर अनेक लोकांना हृदयाशी संबंधित समस्या वाढतात. तज्ज्ञांच्या मते, हृदयरोग्यांनी हिवाळ्यात विशेष काळजी (Don’t neglect heart health in winter) घ्यावी. थंडीच्या मोसमात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या वृद्धांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे होतात हृदयाच्या समस्या :
थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळे हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडचण येते व हृदयक्रिया बंद पडू शकते.

डॉक्टरांचा सल्ला आहे कि हिवाळ्यात हृदयविकार टाळण्यासाठी विशेष काळजी (Don’t neglect heart health in winter) घ्यावी, अश्या प्रकारे काळजी घ्यावी. (Heart Patients Winter)

थंडी पासून सुरक्षित राहावे :
जे लोक हृदयविकाराचे रोगी आहेत किंवा वृद्ध आहेत, त्यांनी थंडीपासून दूर राहावे. थंड हवामानात स्वत: ला उबदार ठेवण्यासाठी योग्य कपडे निवडणे आवश्यक आहे. तसेच गरम पदार्थांचे सेवन करावे.

धुके टाळा :
मॉर्निंग वॉकमुळे आरोग्य चांगले राहते असा अनेकांचा समज आहे. पण हिवाळ्यात धुके असते, जे श्वासासाठी धोकादायक ठरू शकते. अशा स्थितीत विशेषत: वृद्धांनी सूर्य उगवल्यानंतरच फिरायला जावे.

चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका :
हिवाळ्यात पाणी कमी पिले जाते त्यामुळे पचनक्रिया चांगली होत नाही. अशावेळी सहज पचणारे अन्न खावे. फॅटी फूड खाल्ल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. (Heart Patients Winter)

रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी करा :
ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमितपणे स्वत:ची तपासणी करून घ्यावी.
यासोबतच त्यांनी रोज काही वेळ उन्हात बसावे.
सूर्यकिरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन डी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Web Title :- Heart Patients Winter | heart patients should take more care in winter here are the reasons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Home Remedies To Stop Hiccups | उचक्या थांबिण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती ट्रिक्स, जाणून घ्या

Gold Price Today | सोनं पुन्हा 52 हजाराची पातळी गाठणार ? सध्या बाजारात सोन्याचा भाव किती? जाणून घ्या