PM Kisan | तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नसतील तर ही कामे नक्की करून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi yojana) अंतर्गत आतापर्यंत देशातील करोडो लोकांना पैसे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पीएम किसानचा (PM Kisan) 10 वा हप्ता 10.57 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. सध्या दोन कोटी शेतकऱ्यांचा डिसेंबर-मार्चचा हप्ता थकीत आहे. कारण PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 12.44 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबे नोंदणीकृत आहेत.
तुम्हाला पीएम किसानचे (PM Kisan) पैसे अजून मिळाले नसतील तर काही महत्त्वाचे काम त्वरित करून घ्या. यासाठी पीएम किसान टोल फ्री क्रमांक, हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. येथून तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता का थकीत झाला आहे.
हप्त्या थकीत होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की आधार, खाते नाव आणि बँक खाते क्रमांकातील चूक. अश्या चुका झाल्या असतील तर येत्या ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ताही मिळणार नाही. तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटला ऑनलाइन भेट देऊन हे दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही.
तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील
– तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
– येथे वरती तुम्हाला फॉरमर्स कॉर्नर अशी एक लिंक दिसेल.
– तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास आधार एडिटची एक लिंक दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता. तसेच, जर तुम्ही चुकीचा खाते क्रमांक भरला असेल किंवा तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकामध्ये काही बदल करायचे असतील, तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्ही झालेली चूक दुरुस्त करू शकता.
यामुळेही हप्ता अडकू शकतो
अनेक राज्यात अपात्र शेतकरीही याचा लाभ घेत होते. अशा शेतकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सरकारने सुरुवात केली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे घेतलेल्या आयकरदात्यांकडून सर्वाधिक पैसे वसूल केले आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची नावे दहाव्या हप्त्यातून काढून टाकण्यात आली आहेत.
स्टेटस चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
– सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
– येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ चा पर्याय मिळेल.
– व ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
– नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यामधील कोणताही एक पर्याय निवडा.
या तीन क्रमांकांद्वारे > तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
– तेथे तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
– क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवहाराची सर्व माहिती मिळेल.
म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला आहे.
तरीही माहिती न मिळाल्यास मंत्रालयात याद्वारे संपर्क साधा.
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
PM किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401
PM किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
ई-मेल आयडी: [email protected]
Web Title :- PM Kisan | how to find pm kisan kist you too have not received the money so definitely do this work PM kisan samman nidhi yojana
Ration Card | रेशन कार्ड नसेल तरी देखील मिळणार मोफत अन्नधान्य; जाणून घ्या
Maharashtra Rains | आगामी 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’