Symptoms Of Irregular Periods | अनियमित मासिक पाळीने त्रस्त आहात का? ‘हे’ 5 घरगुती उपाय पडतील उपयोगी; जाणून घ्या

0

 एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Symptoms Of Irregular Periods | मासिक पाळी ही महिलांमध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याचे चक्र 28 दिवस असते. प्रत्येक स्त्रीची मासिक पाळी वेगवेगळी असते, परंतु सरासरी दर 28 दिवसांनी मासिक पाळी येते. यापेक्षा जास्त किंवा कमी मासिक पाळी आल्यास यास अनियमित मासिक पाळी म्हणतात. कधीकधी अनियमित मासिक पाळी ही महिलांची सर्वात मोठी समस्या बनते. (Symptoms Of Irregular Periods)

अनियमित मासिक पाळी येण्याची कारणे (Causes of irregular menstruation) –


1.
बदलती जीवनशैली आणि बदलते हार्मोन्स हे अनियमित मासिक पाळी येण्याचे सर्वात मोठे कारण आहे.


2.
व्यस्त जीवनशैलीमुळे स्त्रिया घर आणि ऑफिसच्या तणावाखाली राहतात,
ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. तज्ञांच्या मते, तणावाचा थेट
परिणाम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सवर होतो, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते.


3.
वेबएमडीनुसार, अनियमित मासिक पाळी येण्याची इतर अनेक कारणे आहेत,
जसे की अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे.


4.
खराब आहार.


5.
गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर.


6.
जास्त व्यायाम


7.
थायरॉईड.

जर तुम्हालाही अनियमित मासिक पाळीमुळे त्रास होत असेल तर तुम्ही
घरगुती उपायांनीही त्यावर उपचार करू शकता. (Symptoms Of Irregular Periods)


1. आल्याचे सेवन करा (Eat ginger) –

आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते इम्युनिटी सुधारण्यासोबतच मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. मासिक पाळी सुरू होण्याच्या 7 दिवस आधी तुम्ही आले खाण्यास सुरुवात केली तर तुमची मासिक पाळी नियमित होईल.

2. ओव्याचे सेवन करा (Eat ova) –
मासिक पाळी अनियमित होत असेल तर ओव्याचे सेवन करा.
ओव्याची काही पाने एक ग्लास पाण्यात उकळून कोमट करून प्या.

 

3. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple cider vinegar)
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. लक्षात ठेवा की अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पातळ केल्यानंतरच सेवन केले पाहिजे.

4. जिर्‍याचे सेवन करा –
रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी गरम करून पाणी प्या.
जिरे गर्भाशयाचे स्नायू आकुंचित करते आणि अनियमित मासिक पाळी बरी करते.

5. बदामाचे दूध प्या (Drink almond milk) –
अनियमित मासिक पाळी दूर करण्यासाठी बदामाचे दूध प्रभावी आहे.
एक कप दुधात काही बदामाचे छोटे तुकडे टाका आणि गॅसवर शिजवा.
काही वेळ दूध शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि कोमट झाल्यावर सेवन करा.

 

Web Title :- Symptoms Of Irregular Periods | what are the cause and symptoms of irregular periods know the best tips to prevent it

Join our Telegramfacebook page and Twitter for every update

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मध्ये वाढीबाबत चित्र स्पष्ट, जाणून घ्या किती वाढणार पगार

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Leave A Reply

Your email address will not be published.