7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मध्ये वाढीबाबत चित्र स्पष्ट, जाणून घ्या किती वाढणार पगार

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) पुन्हा आनंदाची बातमी मिळू शकते. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार (Dearness Allowance Hike) आहे. म्हणजेच कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा बंपर वाढ (DA Hike) होणार आहे. जवळपास तीन वर्षांपासून फिटमेंट फॅक्टरबाबत (Fitment Factor) केंद्रीय कर्मचार्‍यांकडून केल्या जात असलेल्या मागणीवर केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. (7th Pay Commission)

पुन्हा वाढणार कर्मचार्‍यांचे पगार
केंद्रीय कर्मचार्‍यांचे फिटमेंट फॅक्टर वाढल्यास त्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल. मात्र, महागाई भत्त्यात (डीए वाढ) किती वाढ होणार याचा निर्णय झालेला नाही. ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) नोव्हेंबरचा डेटा बाहेर आला आहे. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, डीए 2 ते 3% ने वाढण्याची अपेक्षा आहे.

 

सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारीमध्ये डीएमध्ये 2% ते 3% वाढ झाल्यास कर्मचार्‍यांना 33 ते 34% डिए मिळण्यास सुरुवात होईल. म्हणजेच पुन्हा एकदा कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होणार आहे. (7th Pay Commission) नोकरदारांना नवीन वर्षात मिळेल आनंदाची बातमी ! (Good News For Central Government Employees)
डिसेंबर 2021 अखेर केंद्राच्या काही विभागांमध्ये पदोन्नती होणार आहे. याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील चर्चा आहे, ज्यावर सरकार निर्णय येऊ शकते. असे झाल्यास किमान मूळ वेतनातही वाढ होईल. परंतु, सध्या महागाई भत्त्याबाबत AICPI निर्देशांकाचा डेटा काय सांगतो, ते जाणून घेवूयात.

 

 

जुलै 2021 पासून डीए कॅल्क्युलेटर

महिना – आकडे – डीए – टक्केवारी

जुलै 2021 – 353 – 31.81%

ऑगस्ट 2021 – 354 – 32.33%

सप्टेंबर 2021 – 355 – 32.81%

नोव्हेंबर 2021 – 362.016

डिसेंबर 2021 – –

डीएच्या आकड्यांची गणना

जुलैसाठी गणना – 122.8x 2.88 = 353.664

ऑगस्टसाठी गणना – 123x 2.88 = 354.24

सप्टेंबरसाठी गणना – 123.3x 2.88 = 355.104

नोव्हेंबरसाठी गणना – 125.7x 2.88= 362.016

34% डीएवर गणना
महागाई भत्ता 3% ने वाढवल्यानंतर एकूण डीए 34% होईल. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 73,440 रुपये असेल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक 6,480 रुपये वाढ होणार आहे.

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु.5580/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 6120- 5580 = रु 540/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 540×12 = रु. 6,480

कमाल मूळ पगाराची गणना

1.
कर्मचार्‍याचे मूळ वेतन (Basic Salary Rule) रु 56900


2.
नवीन महागाई भत्ता New DA (34%) रुपये 19346/महिना

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु 17639/महिना


4.
19346-17639 ने किती महागाई भत्ता वाढला = रु 1,707/महिना


5.
वार्षिक पगारात वाढ 1,707 x12 = रु. 20,484


Web Title : –
7th Pay Commission | 7th pay commission da hike by 2 to 3 percent again in 2022 see here full calculation da hike cpc latest news

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Earn Money | सुरू करा जबरदस्त नफा देणारा व्यावसाय, घरबसल्या होईल दरमहा 6 लाख रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Blood Sugar Control | ब्लड शुगर कंट्रोल करण्यात उपयोगी ठरू शकते ‘हे’ एक फूल, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Leave A Reply

Your email address will not be published.