Benefits Of Black Pepper | पचन सुरळीत ठेवण्यासोबतच काळीमिरी हंगामी आजारांवरही गुणकारी, Omicron पासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Benefits Of Black Pepper | औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळीमिरी (Black pepper) हा असा गरम मसाला आहे, जो जेवणाची चव तर वाढवतोच, सोबतच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो. काळीमिरी अनेक आजारांवर गुणकारी आहे. अँटी इफ्लेमेंटरी (Anti-Inflammatory) आणि पाचक गुणधर्मांनी (Digestive Properties) समृद्ध काळीमिरी पचन व्यवस्थित ठेवते. (Benefits Of Black Pepper)

संधिवात (Rheumatoid Arthritis) आणि त्वचेच्या समस्यांवर (Skin Problem) काळीमिरी उत्तम गुणकारी आहे. ती रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) करते. हिवाळ्यात इम्युनिटी कमकुवत (Immunity) होते आणि मौसमी आजार त्रास देतात, अशा स्थितीत काळीमिरी खाल्ल्याने सुटका मिळते.

कोरोनाच्या काळात काळीमिरी खाणे खूप प्रभावी आहे. आयुष मंत्रालयाने इम्युनिटी वाढवण्यासाठी काळीमिरी वापरण्याचा सल्ला दिला होता. ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्यासाठी काळीमिरीचा मर्यादित वापर प्रभावी आहे. काळीमिरी चाट, सलाड, सूप आणि अंडे यामध्ये वापरतात. इम्युनिटी वाढवणारी काळीमिरी जेवणाची चव वाढवते. याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात. (Benefits Of Black Pepper)

काळीमिरीचे फायदे


1. वजन नियंत्रित करते (Controls weight)

एका अभ्यासानुसार, जेवणात काळी मिरी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. काळ्यामिरीत असलेले पिपेरिन आणि अँटीओबेसिटी वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.


2. सर्दी आणि खोकल्यासाठी सर्वोत्तम उपाय :

सर्दी-खोकला (Cold-Cough)आणि कफ दूर करण्यासाठी काळीमिरी खूप गुणकारी असल्याचे अनेक वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. यामध्ये पिपेरिन नावाचे कंपाऊंड असते, जे सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून आराम देते. घसा दुखत असल्यास काळीमिरी खावी, घशाला आराम मिळतो.

 

3. तोंडाच्या आरोग्याची घेते काळजी :
काळी मिरी खाल्ल्याने तोंडाचे आरोग्य (Mouth Health) चांगले राहते. एका वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की यामध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकतात.

याचे सेवन केल्याने हिरड्यांना आलेली सूज कमी होते, तसेच दातांच्या समस्यांपासून सुटका मिळते.
दातांमध्ये दुखत असेल तर लवंगाच्या तेलात काळीमिरी पावडर मिसळून दातांना मसाज करा, आराम मिळेल.


4. भूक लागत नसेल तर खा काळीमिरी (If you are not hungry, eat black pepper)

ज्यांना भूक लागत नाही त्यांनी जेवणात काळीमिरीचा समावेश करावा. काळीमिरीमध्ये अल्कलॉइड्स,
ऑलिओरेसिन आणि तेल सारखी काही संयुगे असतात जी भूक वाढवण्यासाठी प्रभावी असतात.

Web Title :- Benefits Of Black Pepper | amazing health and nutritions benefits of black pepper know how to use it


Join our Telegramfacebook page and Twitter for every update

Symptoms Of Irregular Periods | अनियमित मासिक पाळीने त्रस्त आहात का? ‘हे’ 5 घरगुती उपाय पडतील उपयोगी; जाणून घ्या

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA मध्ये वाढीबाबत चित्र स्पष्ट, जाणून घ्या किती वाढणार पगार

Leave A Reply

Your email address will not be published.