Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्ल्यावर आता नागरिकांना ‘नो एन्ट्री’

0

पुणे : एन पी न्यूज 24  – Sinhagad Fort Pune | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. यातच पुण्यातही (Pune News) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुण्यात निर्बंध (Restrictions) लागू केलेत. त्याचबरोबर पुण्यातील सिंहगडावर (Sinhagad Fort Pune) देखील नागरिकांना प्रवेशबंदी (No Entry) घालण्यात आली आहे. याबाबत माहिती पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (Rahul Patil) यांनी सोमवारी दिली. पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांना सिंहगडावर गडावर जाण्यास बंदी असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटनस्थळे (Tourist Places in Pune) बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील सिंहगड किल्लाही (Sinhagad Fort Pune) पर्यटनासाठी बंद केला आहे. तसेच पुढील सूचना येईपर्यंत सिंहगड बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पायथ्याशी गर्दी करू नये. खरंतर आठवड्याच्या शेवटी परिसरात पर्यटनाचे आयोजन करू नये, गडावर जाणारा पायवाटेचा आणि वाहतुकीचा रस्ता बंद राहणार असल्याच्या सुचना वन विभागाकडून (Pune Forest Department) देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सिंहगडावर (Sinhagad Fort News) नागरीकांना प्रवेशबंदी असल्याने याचा फटका जवळील रेस्टॉरंट, फार्म हाउस, गडावरील खाणावळी चालकांना बसणार आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता तेव्हा पर्यटकांनी गडावर गर्दी केली होती. त्याचबरोबर पुणेकर शनिवार आणि रविवार या दिवशी सिंहगडावर फिरण्यासाठी बेत आखत होते. त्याला आता चाप बसला आहे. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत सिंहगड किल्ल्यावर नागरिकांना प्रवेशबंदी असणार असल्याचं वनविभागाने सांगितलं आहे.

 

Web Title :- Sinhagad Fort Pune | citizens barred from entering sinhagad fort Pune Forest Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO E-Nomination | ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता पाहता येणार नाही तुमच्या PF खात्याचा बॅलन्स

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Cyber Crime | पुण्यात सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (ACP) सायबर चोरट्याने घातला गंडा

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात; बोअरवेल ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ‘विजय कुलकर्णी’ जागीच ठार

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी ! शिरसाई मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड, 25 मंदिरातील चोरीचे गुन्हे उघड

Leave A Reply

Your email address will not be published.