Maharashtra Police Corona | राज्य पोलीस दलाला कोरोनाचा ‘विळखा’ ! एकाच दिवसात 298 पोलीस बाधित, 2 डोस घेतल्यानंतरही 1625 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना लागण

0

मुंबई : एन पी न्यूज 24  – Maharashtra Police Corona | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत राज्य पोलीस दलाला कोरोनाचा (Coronavirus) मोठा विळखा पडला आहे. दररोज कोरोना बाधित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १६२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तिसर्‍या लाटेत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ३७१ पोलीस अधिकारी असून १२५४ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मुंबईतील एका पोलीस कर्मचार्‍याला (Mumbai Police) कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आतापर्यंत गेल्या काही दिवसात ३ पोलिसांचा मृत्यु झाला आहे. (Maharashtra Police Corona)

गेल्या २४ तासात राज्यातील २९८ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ७५ आयपीएस अधिकारी (IPS Office) आहेत. पहिल्या लाटेत पोलीस कर्मचारी हे अधिक संख्येने कोरोना बाधित झाले होते. त्यामानाने दुसर्‍या लाटेत ही संख्या कमी होती. आता जवळपास सर्व पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccine) घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, अशी मानसिकता तयार झाल्याचा मोठा फटका सध्या राज्य पोलीस दलाला बसत आहे (Maharashtra Police Corona). त्यातच तिसर्‍या लाटेत कोरोनाची लक्षणे व त्रास दिसून येत नसला तरी त्याचा वेगाने फैलाव होत असल्याचे रस्त्यावर असलेल्या पोलिसांना त्याची लागण होताना दिसत आहे.

 

Web Title : – Maharashtra Police Corona | 298 maharashtra policemen were infected, 1625 police officers were infected even after taking 2 doses

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sinhagad Fort Pune | सिंहगड किल्ल्यावर आता नागरिकांना ‘नो एन्ट्री’

EPFO E-Nomination | ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता पाहता येणार नाही तुमच्या PF खात्याचा बॅलन्स

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Cyber Crime | पुण्यात सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (ACP) सायबर चोरट्याने घातला गंडा

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात; बोअरवेल ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ‘विजय कुलकर्णी’ जागीच ठार

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

Leave A Reply

Your email address will not be published.