EPFO E-Nomination | ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता पाहता येणार नाही तुमच्या PF खात्याचा बॅलन्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO E-Nomination | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. खातेदार ई-नॉमिनेशनशिवाय पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत. आत्तापर्यंत तसे करण्याची गरज नव्हती. पण, आता पीएफ खात्यातील (PF Account) शिल्लक तपासण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटला भेट देऊन खातेधारक ई-नॉमिनेशन शिवायही पीएफ शिल्लक आणि पासबुक सहजपणे तपासू शकत होते. (EPFO E-Nomination)
द्यावी लागेल ही माहिती
ईपीएफ खात्यात ई-नॉमिनेशनसाठी, नॉमिनीचे नाव आधी द्यावे लागेल. त्याचा पत्ता आणि खातेदाराशी असलेले नाते नमूद करावे लागेल. नॉमिनीच्या जन्मतारखेसोबत हे देखील सांगावे लागेल की पीएफ खात्यात जमा रक्कमेतील किती टक्के हिस्सा द्यायचा आहे. नॉमिनी व्यक्ती अल्पवयीन असल्यास, त्याच्या/तिच्या पालकाचे नाव आणि पत्ता देणे आवश्यक आहे. नॉमिनी व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे.
यासाठी आहे आवश्यक
कोणत्याही बचत योजना खात्याच्या बाबतीत नॉमिनेशन अनिवार्य आहे. यासह, खातेदाराच्या मृत्यूनंतर, खातेदाराला त्याच्या नंतर ज्या व्यक्तीपर्यंत पैसे पोहोचायचे असतात त्याच्यापर्यंत पैसे पोहोचतात. EPF आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या बाबतीतही नॉमिनेशन केले पाहिजे जेणेकरून EPFO सदस्याच्या अकाली मृत्यूनंतर, नॉमिनी व्यक्तीला हा निधी वेळेत मिळेल. (EPFO E-Nomination)
या पद्धतीने करू शकता ई-नॉमिनेशन
1] प्रथम EPFO ची वेबसाइट www.epfindia.gov.in वर व्हिजीट करा.
2] तुमचा UAN No. आणि पासवर्ड नोंदवून लॉगइन करा.
3] नंतर मॅनेज टॅबवर क्लिक करून ई-नॉमिनेशन ऑपशन निवडा.
4] आता नवीन पेज ओपन होईल, तिथे मेंबरची पूर्ण माहिती जसे की, नाव, UAN, जन्म तारीख दिसेल.
5] नंतर मुळ आणि सध्याचा पत्ता नोंदवून सेव्ह ऑपशनवर क्लिक करा.
6] आता कौटुंबिक घोषणा अपडेट करण्यासाठी YES च्या पर्यायावर क्लिक करून अॅड फॅमिली ऑपशनवर जा.