Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी ! शिरसाई मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड, 25 मंदिरातील चोरीचे गुन्हे उघड

0

पुणे :  एन पी न्यूज 24 – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शिर्सूफळ येथील श्री शिरसाई माता मंदिरात (Sri Shirsai Mata Mandir) चोरी झाली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी (Baramati taluka police) 24 तासात आरोपींना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आरोपींमध्ये पती-पत्नी आणि मेव्हणीचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या साहित्यासह गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त (Pune Crime) केली आहे. अशी माहिती पुणे ग्रामीणच्या (Pune Rural Police) बारामतीचे (Baramati Additional SP) अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते (Addl SP Milind Mohite) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शाहरुख राजु पठाण Shah Rukh Raju Pathan (वय-24 रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे 4 जवळ, कोल्हापूर, मुळ रा. शिव तकारवाडी, निरा, ता. पुरंदर) पुजा जयदेव मदनाळ Puja Jaydev Madanal (वय-19 रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे 4 जवळ मुळ रा. जुनाबिडी कुंभारी सोलापुर, जि. सोलापुर), अनिता गोविंद गजाकोश Anita Govind Gajakosh (वय-19 रा. गोपाळ शिरगाव, कोल्हापुर, मुळ रा. गोलघुमट, विजापुर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शाहरुख आणि पुजा हे पती-पत्नी आहेत तर अनिता ही मेव्हणी आहे.

शिरसाई मंदिरात शनिवारी (दि.8) रात्री एक ते पहाटे तीन या दरम्यान चोरी झाली होती. देवीच्या दागिन्यांसह (Jewelry) पितळी समया, पणत्या असा 15 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. वैभव विश्वनाथ क्षीरसागर (Vaibhav Vishwanath Kshirsagar) या पुजाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तात्काळ शिर्सूफळला भेट दिली होती. त्यावेळी आरोपांना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन त्यांनी संतप्त ग्रामस्थांना दिले होते. (Pune Crime)

 

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. चोरीच्या घटनेनंतर वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली. त्यांनी शिर्सूफळ, दौंड तालुक्यातील मळद, कुरकुंभ, दौंड, बारामती आणि आसपासच्या परिसरातील 60 ते 65 सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची पाहणी केली. मात्र रात्रीची वेळ असल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. परंतु वाहनाचा क्रमांक पोलिसांना मिळाला. संशयितांनी मास्क परिधान केल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते.

 

गुन्ह्यात वापरलेली एमएच14 एफएक्स 4576 या इको कारचा शोध सुरु केला. या गाडीच्या वाहनाच्या मुळ मालकाचा शोध घेतला असता ते पिंपरी येथील असल्याचे समजले. त्यांची गाडी 4 डिसेंबर रोजी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांसमोरील काम आणखी कठीण बनले.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी वर्धनगड परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशन दिसून आले. हा भाग डोंगराळ असल्याने लोकेशन व्यवस्थित मिळाले नाही. अखेर आरोपी गोकूळ शिरगावला (Gokul Shirgaon) असल्याचे लक्षात आले. बारामती पोलिसांचे एक पथकाने गोकूळ शिरगाव गाठत तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेल्या कारसह इतर साहित्य असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी शिर्सूफळ येथे चोरी करण्यापूर्वी आरोपींनी दौंड येथील एका मंदिरात चोरी करुन शिर्सूफळहून पुढे जाताना पुसेगावातही एका मंदिरात चोरी केल्याचे तपासात समोर आले.

 

 

20-24 मंदिरात चोरी
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी शिरसाई माता मंदिरात चोरी सह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा,
कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या जवळपास 2-24 मंदिरातील दागिने व इतर साहित्य चोरल्याची कबुली दिली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली
ही कारवाई पुणे ग्रमीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (SDPO Ganesh Ingle)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण (Police Inspector Mahesh Dhawan),
सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे (API Yogesh Langute), पोलीस हवालदार रमेश भोसले,
पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,
रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Great achievement of Pune Rural Police! Shirsai temple burglary gang arrested, 25 temple burglary cases uncovered – Addl SP Milind Mohite

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात नोकरी गेल्यानं ‘जीवरक्षक’ तरूणाची आत्महत्या, मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना; जाणून घ्या कारण

Maharashtra Weather | उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले; नाशिक, निफाडमध्ये हंगामातील निचांकी किमान तापमानाची नोंद

Pimpri Corona Updates | चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1200 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Leave A Reply

Your email address will not be published.