Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

0

बारामती : एन पी न्यूज 24  – जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका 50 वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन निर्घृण खून (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे घडली आहे. ही घटना रविवारी (दि.9) दुपारी घडली असून शेळ्या अंगणात जाण्याच्या कारणावरून महिलेचा खून केल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. गंगूबाई तात्याराम मोरे Gangubai Tatyaram More (वय-50) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गंगूबाई याची सून प्रमिला प्रमोद मोरे (Pramila Pramod More) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गेल्या अडीच वर्षापूर्वी फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहणारे भावकीतील किरण दादा मोरे (Kiran Dada More) यांची फिर्यादीच्या सासू-सासऱ्यांबरोबर शेळ्या (Goat) अंगणात जाण्याच्या कारणावरुन भांडण (Dispute) झाले होते. त्यावेळी भावकीतील लोकांनी दोन्ही बाजूंची समजूत काढून हा वाद मिटवला होता. त्यामुळे त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती.(Pune Crime)

वाद झाल्यापासून दोन्ही कुटुंब एकमेकांशी बोलत नव्हते. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादीने पती, सासू यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर पती बारामतीला कामावर गेले. तर सासू गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेत गप्पा मारण्यासाठी घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ गेल्या होत्या. अडीच वाजण्याच्या सुमारास किरण मोरे हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला. त्याने तेथे गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला.

या घटनेत गंगूबाई या जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार पाहिल्यानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा करत धावत जात आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना ढकलून देत गंगूबाई यांच्या छातीवर पुन्हा वार केले.
तुझ्या सासूचा काटा काढला, तु पुढे ये, तुझा पण काटा काढतो असे धमकावत तो फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला.
त्यानंतर तो पायातील चप्पल जागीच सोडून माळरानाच्या दिशेने पळून गेला.

 

या घटनेनंतर फिर्यादी यांनी पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी यांच्या कुटुंबाने आरोपी किरणला जो पर्यंत पकडत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू न देणार नसल्याची भूमिका घेतली.
त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी कुटुंबाची सजूत घालून मृतदेह बारामती सरकारी रुग्णालयात (Baramati Government Hospital) हलवला.
पोलिसांनी आरोपी किरण मोरे याचा शोध घेऊन अटक केली.
अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते (API Mahesh Vidhate) यांनी दिली.

Related Posts