ब्रिटन निवडणूक : काश्मिरवरून भारताला विरोध करणारी लेबर पार्टी पराभूत, कंझर्व्हेटिव्हला बहुमत

0

लंडन : एन पी न्यूज 24 – ब्रिटनमध्ये शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. सुरूवातीच्या निकालातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने बहुमताचा आकडा (३२६) ओलांडला आहे. तर विरोधी पक्ष असलेली लेबर पार्टी २०० जागांच्या जवळ पोहोचली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुरूवातीचे निकाल मनासारखे आल्यानंतर ट्विट करत आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले, युके जगातील सर्वात महान लोकशाही आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले, जे आमचे उमेदवार आहेत, त्या सर्वांचे आभार.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कंझर्व्हेटिव्ह पार्टीला ३६८ आणि लेबर पार्टीला १९१ जागा मिळू शकतात. निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव होण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर जेरेमी कॉर्बिन यांनी लेबर पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कॉर्बिन म्हणाले, यापुढे पक्षाचे नेतृत्व करणार नाही. कॉर्बिन यांनी या पराभवाला ब्रेग्झिट असल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढेही सामाजिक न्यायाचा मुद्दा पक्ष उचलून धरेल. आम्ही पुन्हा येऊ, लेबर पार्टीचा संदेश नेहमी अस्तित्वात राहील, असे ते म्हणाले.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.