आता पासपोर्टवरही ‘कमळ’, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले ‘हे’ अजब कारण

0


नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – भारतीय नागरिकांच्या पासपोर्टवर राजमुद्राऐवजी आता भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ दिसणार आहे. केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आल्यानंतर संसदेत हा मुद्दा गाजत आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने एक खुलासा केला आहे.

याप्रकरणी संसदेत विरोधीपक्षांनी आवाज उठवल्यानंतर, कमळ हे राष्ट्रीय फुल असून ते देशाचे प्रतिक आहे, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची सारवासारव परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे केरळात वाटप झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी वृत्तपत्रांनी याबाबत माहिती दिल्याचे सांगत, सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातल्याची टीका राघवन यांनी केली.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.