Shivsena Eknath Shinde | उमेदवार ठरवतानाही भाजपचा दबाव? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर; ठाकरे ब्रँड सोडून चूक तर केली नाही? शिवसैनिकांना विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची चिंता

0

पुणे – Shivsena Eknath Shinde | शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर पहिल्यांच निवडणुकीला सामोरे जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागत आहे. विशेषत: 40 आमदारांच्या बळावर पक्षाचे नाव आणि चिन्ह पदरी पडल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) 13 जागांवर उमेदवार देताना भाजपच्या सर्व्हेच्या दबावाखाली राहावे लागत आहे. याउलट पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून सर्वाधिक 21 जागा घेत ठाकरे ब्रँडचा (Thackeray Brand) स्वामीमान कायम राखला आहे. यानिमित्ताने शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या शतप्रतिशतच्या नार्‍याच्या वस्तुस्थितीबाबत साशंकता वाढली असून राजकिय भवितव्याच्या दृष्टीने अनेकांचा प्रवास पुन्हा स्वाभीमानी ठाकरेंच्या दिशेने सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

   राज्यात शिवसेनेत फूट पडून भाजपसोबतच्या सत्तेला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी संधी देतानाच भाजपने सत्तेचे सुकाणू आपल्याच हाती ठेवल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. केंद्रातील सत्ता हाती राहील्यास राज्यातील सत्तांकुश आपल्या हाती ठेवता येते, हे भाजपने मागील दहा वर्षात वेळोवेळी दाखवून दिले आहे. मागील दहा वर्षांत कर्नााटक, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्यांतील विरोधकांच्या सत्ता उलटवून ताबा मारला आहे. आजही दिल्ली, झारखंड व अन्य राज्यांत प्रमुख विरोधकांना ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि इन्कम टॅक्सची (Income Tax) आयुधे वापरून जर्जर केले जात आहे.

   भाजपने प्रमुख विरोधक काँग्रेसमुक्त (Congress) भारत करण्याचा नारा देतानाच शतप्रतिशत भाजपची घोषणा दिल्याने विरोधकच नव्हे तर भाजपसोबत गेलेल्या विरोधकांना भविष्याची चिंता सतावत आहे. परंतू ईडी, सीबीआयचे भुत मानगुटीवर असल्याने इकडे आड तिकडे विहीर अशा कात्रीत प्रमुख विरोधक सापडले आहे. त्यामुळेच शिवसेनेतून बाहेर पडून स्व::तकडे पक्षाचे नेतृत्व घेतलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप नेतृत्वाचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानावा लागत असल्याचे लोकसभेच्या उमेदवारी वाटपावरून स्पष्ट दिसत आहे.

शिंदे यांनी भाजपच्या दबावाखाली हिंगोलीचे (Hingoli) खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) याची जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. पाचवेळच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना यवतमाळ वाशीम मतुदार संघातून (Yavatmal–Washim Lok Sabha ) उमेदवारी नाकारण्यात आली आहे. शिरूरचे (Shirur Lok Sabha) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना तडजोड म्हणून अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करावा लागला. विशेष असे की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडताना याच शिंदे आणि आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा शेलक्या शब्दात उद्धार केला होता. नाशिक मतदार संघातून (Nashik Lok Sabha) विद्यमान खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्हयातील ठाणे आणि कल्याण मतदार संघ (Kalyan Lok Sabha) शिवसेनेला देण्यास भाजपचा विरोध असल्याने अद्याप शिंदे हे त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांची उमेदवारी जाहीर करू शकलेले नाहीत.

याउलट महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे यांनी तब्बल 21 जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. येथील उमेदवारही जाहीर केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद राहावी यासाठी काँग्रेसला कोल्हापूर मतदार संघ सोडताना सांगलीची जागा पटकावली आहे. या जागेवरून काँग्रेससोबत वाद सुरू असले तरी ठाकरे यांनी ठाम भुमिका घेत येथून उमेदवारही जाहीर केला आहे. मुंबईतील दोन मतदार संघ काँग्रेसला सोडले असले तरी लवकर उमेेदवार जाहीर करा अन्यथा आम्ही उमेदवार देउ अशी ठाकरे यांनी भूमिका घेतल्याने शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेच्या मतदारांमध्ये उत्साह वाढला आहे. 2014 पासून शतप्रतिशत च्या भुमिकेतून मित्रपक्षांची संस्थाने खालसा करण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करणार्‍या भाजपला रोखण्यासाठी 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करून भाजपला जागा दाखविणार्‍या उद्धव ठाकरे यांनी पुढेही अगदी दिल्लीत जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट टीका करत महाराष्ट्राच्या स्वाभीमानाचे दर्शन घडविल्याने शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

यापार्श्वभूमीवर भाजप मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी मित्र पक्षांनाही स्वत: च्या अजेंड्यावर नाचवत असल्याची खंत शिंदे यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास विधानसभा, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, पिंपरी चिंचवड,नागपूर, नवी मुंबई, कोल्हापूर यासारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुकीतही भाजप नेतृत्वाकडून आपले खच्चीकरणच केले जाईल, अशी भितीही विधानसभा आणि महापालिका व स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या शिंदे यांच्या आमदार आणि नगरसेवकांमध्ये दिसून येउ लागली आहे. लोकसभा जागा वाटप आणि उमेदवारीच्या घडामोडी पाहून ठाकरे ब्रँड सोडून चूक तर झाली नाही ना ? अशी शंका उपस्थित करून अनेकजण मनाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जावू लागल्याचे राजकिय चोतून पुढे येउ लागले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.