Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : भररस्त्यात कोयत्याचा धाक दाखवून लुटले, हवेत कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या आरोपीला अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने (Robbery Case) खिशातून पैसे काढून घेतले. तसेच हातातील कोयता हवेत फिरवुन परिसरात दहशत माजवली. दहशत पसरवणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास स्पाईन रोड चिखली (Spine Road Chikhali) येथे घडली.

याबाबत राजकुमार महादेव कल्याणी (वय-24 रा. डुडुळगाव, मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाश उर्फ गणेश श्रीगोंड (रा. काळेवाडी, पिंपरी) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार महादेव (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 394, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा आहे. सोमवारी सांयकाळी फिर्य़ादी स्पाईन रोड चिखली येथील सर्व्हिस रोडने पायी चालत चालले होते. त्यावेळी दोघेजण दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. आरोपी प्रकाश याने फिर्यादी यांना थांबवून पाचशे रुपये मागितले. त्यावेळी फिर्यादी यांनी पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने प्रकाश याने शिवीगाळ करुन तुला लई माज आलाय असे म्हणून फिर्य़ादी यांची गचांडी पकडून हाताने मारहाण केली.

प्रशांत याने गाडीवर बसलेल्या महादेव याच्याकडे कोयता मागून घेऊन फिर्यादी यांच्यावर उगारला. फिर्य़ादी यांच्या पँन्टच्या खिशात हात घालून जबरदस्तीने नऊशे रुपये काढून घेत त्यांना ढकलून दिले. यानंतर महादेव याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांच्या मदतीसाठी लोक थांबले असता आरोपी प्रशांत याने हातातील कोयता हवेत फिरवला. इथे कोणी थांबला तर कापुन टाकीन अशी धमकी देऊन हातातील कोयता लोकांच्या दिशेने रोखून दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.