Pune Katraj Crime | पुणे : दहावीचा पेपर देऊन निघालेल्या तरुणावर हत्याराने वार

0

पुणे : – Pune Katraj Crime | दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या तरुणाला शिवीगाळ करुन हत्याराने मारहाण (Marhan) करुन जखमी केल्याची घटना कात्रज परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.26) दुपारी दीडच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील कृष्णा सागर हॉटेल समोर घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संतोषनगर, कात्रज येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. यावरुन अमिन मुल्ला, आयान शेख, तनवीर शेख व आबु रेहमान यांच्यावर आयपीसी 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल मंगळवारी दहावीचा पेपर सुटल्यानंतर घरी जात होता. त्यावेळी आरोपीने त्याला हाक मारुन थांबवले. आरोपींनी मृणाल याच्याजवळ येऊन तुला खुप माज आलाय का असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एका आरोपीने त्याच्या हातातील धरदार हत्याराने मृणाल याच्या डाव्या हातावर मारुन गंभीर जखमी करुन आरोपी तेथून पळून गेले. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल भोसले करीत आहेत.

जुन्या भांडणातून अल्पवयीन मुलावर वार

कात्रज : जुन्या भांडणाच्या रागातून एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला मारहाण करुन धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.26) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील भैरवनाथ मंदिरासमोर घडली (Bhairavnath Mandir Katraj) . याप्रकरणी 17 वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओमकार पवार व त्याच्या मित्रावर आयपीसी 324, 323, 504, 34, 4(25) सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्याचा मित्र गप्पा मारत बसले होते. फिर्यादी यांच्या मित्राचे आरोपीसोबत वाद झाले होते. याच वादातून आरोपींनी मित्राला शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्य़ादीचा मित्र तेथून पळून गेला. आरोपींनी फिर्य़ादी याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या हातावर वार करुन पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम (PSI Priyanka Nikam) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.