Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : चोर तो चोर वर शिरजोर! विरुद्ध दिशेने येऊ ट्रकला दिली धडक, चालक व क्लिनरला केली बेदम मारहाण

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime | विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रकला धडक देऊन ट्रक चालक व क्लिनर यांना लाकडी बांबूने बेदम मारहाण (Marhan) केली. हा प्रकार चाकण येथील तळेगाव चौकात मंगळवारी (दि.2) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

याबाबत ट्रक चालक शिव बगेल आणि मोतीलाल बगेल (वय-40 रा. बागली, जि. देवास मध्य प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन संकेत रामदास जाधव (वय-27 रा. वाकी ता. खेड) याला अटक केली आहे. तर सचिन वखरे (वय-21 रा. वाकी) याच्यासह इतर दोन जणांवर आयपीसी 326, 325, 323, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन तळेगाव चौकातून जात होते. त्यावेळी आरोपी सचिन वखरे हा विरुद्ध दिशेने दुचाकीवरुन आला. त्याने ट्रकला उजव्या बाजुने ओव्हरटेक करत असताना अचानक समोर कार आली. कारला वाचवत असताना सचिन याची ट्रकला समोरून धडक बसली. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून संकेत व इतर दोन साथीदारांना बोलावून घेतले.

आरोपी सचिन वखरे याने चैकात तंबुसाठी उभा केलेला लाकडी बांबु हातात घेऊन फिर्यादी यांच्या हाताच्या मनगटावर मारुन हात फ्रॅक्चर करुन जखमी केले. तर ट्रकचा क्लिनर रोहित रुस्तम काकडीया याच्या पायाच्या मांडीवर मारुन जखमी केले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व रोहीत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.