Pune Crime News | पुणे : रहिवासी इमारतीत दरोडा टाकण्याच्या तयारी असलेली टोळी गजाआड

0

पुणे : – Pune Crime News | रहिवासी इमारतीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत (Dacoity Case) असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी (दि.27) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भिलारेवाडी (Bhilarewadi) येथे करण्यात आली.

रोहन गोविंद धुमाळ (वय-20 रा. झेड कॉर्नर, मांजरी, हडपसर) याला अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 399, 402 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार नामदेव निवृत्ती रेणुसे (वय-55) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी भिलारेवाडी येथील रहीवाशी इमातीत दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने भिलारेवाडी येथे जाऊन सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, मिर्ची पावडर, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.