Pune Chandan Nagar Police | मोक्का गुन्ह्यात चार महिने फरार आरोपीला चंदननगर पोलिसांकडून अटक

0

पुणे : – Pune Chandan Nagar Police | रोडवर पार्क केलेल्या वाहनांची धारदार हत्यारे व लोखंडी रॉडने तोडफोड करून वडगाव शेरी गावठाण परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत (Pune Police MCOCA Action) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चार महिने फरार (Abscond In MCOCA Case) असलेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) अटक केली आहे. आदित्य संदेश कांबळे Aditya Sandesh Kamble (वय-23 रा. वडगाव शेरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गुन्हा करुन चार महिन्यापासून सातारा, सांगली, नाशिक अशी वेगावेगळे ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

फरार आरोपी आदित्य कांबळे याचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्वक माहिती घेतली. तर पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सुरज जाधव, कोद्रे यांना माहिती मिळाली की, आरोपी आदित्य कांबळे हा जुना मुंढवा रोड साईनाथनगर वडगाव शेरी येथे येणार आहे. त्यानुसार तपास पथकाने वडगाव शेरी येथे आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी रावल भवन इमारती समोर उभा असल्याचे दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 विजय मगर (DCP Vijaykumar Magar), सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील (Sr PI Manisha Patil), पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad), पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर PSI Tanhaji Shegar), पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.