Pune ACB Trap Case | पुणे: लाच घेताना ग्रामसेवक पुणे अँटी करप्शनच्या जाळ्यात

0

पुणे : Pune ACB Trap Case | उताऱ्यावरील नावाची दुरुस्ती करुन संगणीकृत उतारा देण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना वरसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विठ्ठल वामन घाडगे Vitthal Vaman Ghadge (वय-44) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.28) कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिर भाजी मंडई जवळ असलेल्या पान टपरीसमोर करण्यात आली. (Pune Bribe Case)

याबाबत 45 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे वेल्हे तालुक्यातील वरसगाव येथे वडीलोपार्जीत घर आहे. या मिळकत घर क्रमांक 25 च्या 8 अ उताऱ्यावर तक्रारदार यांचे आईचे व घर क्रमांक 28 च्या 8 अ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव दुरुस्त करुन संगणीकृत दाखला देण्यासाठी ग्रामसेवक घाडगे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे बुधवारी (दि.27) तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामसेवक घाडगे याने पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी दुपारी कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिर भाजी मंडई जवळ असलेल्या पान टपरीसमोर सापळा लावण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारतान विठ्ठल घाडगे याला रंगेहात पकडण्यात आले. घाडगे याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (ACB SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Dr Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.