Pune Chandan Nagar Crime | पुणे : चंदननगर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

0

पुणे : – Pune Chandan Nagar Crime | चंदननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये (Spa Center In Pune) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खराडी परिसरातील शांतीनगर (Shanti Nagar Kharadi) येथील इन्फिनिटी स्थाई स्पा (Infinity Thai Spa Kharadi) येथे 1 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) शिवशंकर राजेंद्र थोरात (वय-24 रा. इन्फीनीटी स्थाई स्पा, सीटी विस्टा बिल्डींग, दुसरा मजला, दर्गा रोड खराडी) याला अटक केली आहे. तर विकास प्रजापती याच्या विरुद्ध आयपीसी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे.

चंदननगर परिसरातील शांतीनगर येथे असलेल्या इन्फिनिटी स्थाई स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटर येथे छापा टाकला. आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.