Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर, रंगली ‘चाय पे चर्चा’, शहराच्या विकासावर मांडले मत (Video)

0

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे भाजपा (BJP) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अपक्ष उमेदवार वसंत मोरे (Vasant More) आज वाडेश्वर कट्टा (Wadeshwar Katta) कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. प्रचारात एकमेकावर टीका टिपण्णी करणारे हे उमेदवार एकाच टेबलवर ‘चाय पे चर्चा’ करत होते. यावेळी प्रत्येकाने आपण शहराच्या विकासासाठी कसे काम करणार आहोत हे सांगितले. यावेळी अंकुश काकडे (Ankush Kakade) देखील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या उमेदवारांनी एकत्र येऊन विकासावर चर्चा करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. पुण्यात तशी परंपरा देखील आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते वाडेश्वर कट्टा कार्यक्रमात एकत्र येत असतात. आज वाडेश्वर कट्ट्यावर या उमेदवारांनी आपले व्हिजन स्पष्ट केले.

यावेळी भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, आमच्या अगोदर कामे सर्वांनी केली. आता पुढे काय करायचे हे बघावे लागेल. मला पुण्याचे पन्नास, शंभर वर्षांचे भविष्य घडवायचे आहे. कारण पुढच्या पिढीने नाव नको ठेवायला की तुम्ही त्या काळात कमी पडला आहात.

केंद्र सरकारच्या दृष्टीने इथल्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे. म्हणजेच पुढील पन्नास वर्षांचा विचार आत करायला हवा. शहरातील राजकीय सामाजिक राजकीय जीवनात मी काम करतो. महापालिका महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पाहता मला शहराचा आवाका माहित आहे. मी पुण्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो आहे. पुण्याला सर्वोच्च स्थानावर घेऊन जायचे आहे. भाजपाबरोबर राहून मला चांगले काम करता येऊ शकते, असे मोहोळ म्हणाले.

तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, राजकीय सामाजिक जीवनात काम करताना मी चौकट आखून घेतली नाही. सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत मी पोहोचलो. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय दिला.

रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, पक्षाला वाटले की मी सामान्यांच्या अडचणी सोडवू शकतो. त्यामुळे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला. त्यांच्या लक्षात आले की पुणेकर यांना चांगले मतदान करू शकतात. म्हणून मला उमेदवारी दिली.

रवींद्र धंगेकर म्हणाले, लोकशाहीत देशाचा विकास झाला. पण केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवले, काहींना पाठवता पाठवता पक्षात घेतले. अजित पवारांबाबत तेच झाले. अशोक चव्हाण यांनाही पक्षात ओढले. भययुक्त राजकारण देशात सुरु आहे. लोकशाही टिकली तर भीतीच्या वातावरणातून मुक्त होतील. तर सामान्यांचे प्रश्नही लवकर सुटतील.

वसंत मोरे म्हणाले, मी काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला. पक्ष सोडला, पुणे शहरात मनसेची एक ताकद आहे. आधीपासून मनसेला चांगले मतदान आहे. एक चुकीचा अहवाल पक्ष श्रेष्ठींकडे गेला त्यामुळे मी बाहेर पडलो.

एका शहराला दिशा देण्याचे काम मी करू शकतो. मी आधीपासून विरोधी पक्षातच आहे. मला ही निवडणूक पुणेकरांच्या प्रश्नांवर लढायची आहे. शहरात वाहतूक, पाणी, कचरा हे प्रश्न महत्वाचे आहेत, वसंत मोरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.