Symbiosis Boys Hostel | पुणे : सिंम्बॉयसिस बॉईज होस्टेलमध्ये तरुणाच्या अंगावर अ‍ॅसिड सदृश रसायन फेकले

0

पुणे : – Symbiosis Boys Hostel | महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेल मधील खोलीत झोपलेल्या तरुणाच्या अंगावर अ‍ॅसिडसदृश रसायन फेकण्यात (Acid Attack) आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना रेंजहिल खडकी (Range Hills Khadki) येथील सिंम्बॉयसिस बॉइज हॉस्टेलमध्ये 23 मार्च रोजी रात्री साडे आठ ते नऊ या दरम्यान घडली आहे.

याबाबत आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय 24, रा. सिंबायोसिस बॉईज हॉस्टेल, रेंजहिल्स) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 326(अ), 342, 448 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस बॉईज हॉस्टेलमध्ये राहायला आहे. शनिवारी (दि. 23) तो वसतिगृहातील खोलीत रात्री साडेआठच्या सुमारास झोपला होता.

त्यावेळी एकजण वसतिगृहातील खोलीचा दरवाजा उघडून खोलीत आला. त्याने अॅसिड सदृश रसायन प्लास्टिकच्या मगमध्ये भरले. झोपेत असलेल्या आशिषकुमार याच्या अंगावर मगमधील रसायन फेकून तो पसार झाला. त्यामुळे त्याच्या अंगावर दाह झाला. त्याने आरडाओरडा केला. खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करुन पळून गेला होता.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode), वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर (PI Girish Kumar Dighavkar) यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाने याबाबत सोमवारी (दि.25) तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रूईकर तपास करत आहेत. पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.