Pune Crime News | पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या दोघांवर FIR, विद्यार्थिनीचा समावेश

0

पुणे : – Pune Crime News | पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेल मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चोरुन व्हिडीओ (Girl Video) काढल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ तिने मित्राच्या मोबाईलवर पाठवले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी त्या व्हिडीओचा गैरप्रकार केला असल्याची माहिती आहे. या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिनींचे व्हि़डीओ काढून सोशल मीडियावर पाठवल्याची माहिती मिळत आहे.

आरोपींनी हॉस्टेलमधील मुलींचे कमी कपड्यातील चोरुन व्हिडीओ काढले. सीओईपी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले की, या प्रकरणी चौकशी सुरु असून पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे. संबंधीत विद्यार्थिनीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. दरम्यान, सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असा प्रकार घडला असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.