Vadgaon Sheri Pune Crime News | पुणे : भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणावर वार, दोघांवर FIR

0

पुणे : – Vadgaon Sheri Pune Crime News | मजुराच्या पगारावरुन सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या कारणावरुन दोन भावांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना घडला आहे. हा प्रकार 26 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील टेम्पो चौकातील तानुष व्हेजीटेबल अँड फ्रुट्स मार्केट येथे घडला आहे. याप्रकरणी दोन भावांवर गुन्हा दाखल केला आहे. (Stabbing Case)

याबाबत विशाल विजय वाघमारे (वय-24 रा. मुरलीधर सोसायटी, सोमनाथ नगर, वडगाव शेरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन राहुल गिरी, संदिप गिरी व त्यांचा एक कामगार (सर्व रा. पोटे चाळ, वडगाव शेरी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र जुबेर सय्यद हा आरोपी राहुल गिरी याच्याकडे मजुर म्हणून काम करत होता. गिरी याने त्याचा दोन महिन्याचा पगार दिला नव्हता म्हणून त्याबाबत बोलणी करत असताना, त्या दोघांमध्ये वादविवाद होऊन भांडण सुरु झाले. भांडण सोडवण्यासाठी विशाल वाघमारे यांनी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने आरोपी व त्याचा भाऊ संदिप गिरी व त्यांचा एका कामगाराने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. राहुल गिरी याने त्याठिकाणी पडलेल्या धारदार हत्याराने विशाल वाघमारे याच्या पाठीवर वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.