Pune Cheating Fraud Case | ऑनलाईन टास्कद्वारे 71 लाखांची फसवणूक, राजस्थान मधील आरोपीचा जामीन फेटाळला

0

पुणे : – Pune Cheating Fraud Case | हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला रिव्हू देण्याचे टास्क देऊन 71 लाख 82 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान येथील एकाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. नरावडे (Judge S.R. Narawade) यांनी फेटाळला आहे. विकास सत्यनारायण व्यास पारीक Vikas Satyanarayana Vyas Pareek (वय-29 रा. राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एकुण 12 जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत हा प्रकार घडला होता. व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामद्वारे टास्क देऊन फसवणूक (Online Task Cheating) करण्यात आली. याप्रकरणी पारीक याला हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) 11 ऑक्टोबर 2023 रोजी अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार (Adv Sanjay Pawar) यांनी विरोध केला.

लोकांची ऑनलाइन फसवणूक करणारी ही टोळी आहे. त्याने बऱ्याच ठिकाणी असे गुन्हे केले आहेत. अशा प्रकारे आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्याच्यावर पालघर जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे. फिर्यादीच्या गुन्ह्यातील रक्कम 71 लाख 82 हजार रुपये अद्याप जप्त केली नाही. तो मूळचा राजस्थान येथील आहे. जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन नाकारण्याची मागणी अॅड. पवार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.