Pune Crime News | पुणे : लहान मुलांच्या वादातून युवकाला लोखंडी रॉडने मारहाण

0

पुणे : – Pune Crime News | लहान मुलांमध्ये खेळण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका युवकाला शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) दोन भावांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.25) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शनिनगर, जांभुळवाडी रोड (Shani Nagar, Jambhulwadi Road) येथे घडला आहे.

याबाबत विशाल शाम भोसले (वय-38 रा. शनिनगर जांभुळवाडी रोड, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवेंद्र दिपक यादव व त्याचा भाऊ गुरु यादव (दोघे रा. शनिनगर) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल भोसले त्यांच्या घराजवळ उभे असताना परिसरात राहणारा देवेंद्र यादव त्याठिकाणी आला. लहान मुलांमध्ये खेळण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातुन फिर्यादी यांनी आरोपी देवेंद्र याला तु माझ्या पुतण्याला शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली.

आरोपीला राग आल्याने तो फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. तसेच तुला लय मस्ती आली का तुला आता सोडणार नाही अशी दमदाटी करुन कानशिलात लगावली. तसेच रस्यावर पडलेला दगड उचून फिर्यादी यांच्या डोक्यात मारण्यासाठी उगारला असता फिर्यादी यांनी त्याला प्रतिकार केला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडा-ओरडा केला असता आरोपी देवेंद्र याचा भाऊ गुरु हातात लोखंडी रॉड घेऊन त्याठिकाणी आला. त्याने लोखंडी रॉड फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहून आरोपी तेथून पसार झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.