Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार केल्याच्या रागातून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण, एकाला अटक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | तडीपार केल्याचा राग मनात धरुन चार जणांनी एका तरुणाला सिमेंटच्या गट्टु ने मारहाण केली. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) दोघांवर गुन्हा दाखल करुन एकला अटक केली आहे. हा प्रकार 25 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथील शंकरनगर येथे घडला आहे.

याबाबत सुजर रामदास भिवरकर (वय-19 रा. धोबी घाट, शंकरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुप्रिम काळे (वय-25 रा. चाकण), अविनाश सुभाष पात्रे (वय-19 रा. शंकरनगर, चिंचवड), विनायक क्षिरसागर (वय-20) सुरेश काटे (वय-24 तिघे रा. शंकरनगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 308, 341, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश पात्रे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुप्रिम काळे याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याचा राग आरोपींच्या मनात होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी सुजल व त्याची बहीण चारचाकी गाडीतून जेवण करण्यासाठी जात हेते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करुन सुजल याची कार अडवली. आरोपींनी त्याला शिवागाळ करुन दमदाटी केली. तर अविनाश पात्रे याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

तुझ्या वडिलांमुळे मला तडीपार केले त्यांना पाहून घेतो अशी धमकी काळे याने दिली. तसेच तडीपार केल्याचा रागातून काळे याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात सिमेंटच्या गट्टुने मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपी पसार झाले. याबाबत तक्रार दिल्यानंतर पिंपरी पोलिसांनी अविनाश पात्रे याला अटक केली असून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.