Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : आठवडे बाजारात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

0

पिंपरी : – Talegaon Dabhade Pimpri Crime News | आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या (Chain Snatching Case) चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री साडे आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील आठवडा बाजारात मारुती मंदीराजवळ घडली आहे.

याबाबत दुराई पंडियान वेंकटा सुब्बियाह तेवर (वय 37 रा. यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. तर हंबीराव धर्मा सुळके Hambirao Dharma Suleke (वय-30 रा. गोडावुन चौक, भोसरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तळेगाव दाभाडे येथील आठवड्याचा बाजार होता. त्यामुळे फिर्यादी यांची पत्नी, मुलगी, मित्राची आई असे सर्वजण भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते.

बाजारात भाजी खरेदी करत असताना फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची चैने जबरदस्तीने हिसका मारून चोरुन नेली. हा प्रकार फिर्य़ादी यांच्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडा ओरडा केला. बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आरोपी सुकळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर आयपीसी 392 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी (PSI Gosavi) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.