Pune Vidyapeeth Crime | पुणे विद्यापीठ आवारात विद्यार्थ्याला मारहाण, 8 जणांवर FIR (Video)

0

पुणे : – Pune Vidyapeeth Crime | व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेली राजकीय पोस्ट (Political Post On Whatsapp Group) डिलीट केल्याच्या रागातून सात आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील आदर्श कॅन्टीन (Adarsh Canteen Pune University) येथे घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीसंनी (Chaturshrungi Police Station) आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनिल भिमराव फुंदे (वय-28 रा. जुनी सांगवी, पिंपरी मुळ रा. वंजारवाडी, ता. जामखेड जि. नगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राम तरपडे, करण वाकोडे, वैभव दिघे, गणेश काकडे व त्यांच्या इतर तीन ते चार अनोळखी तरुणांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्य महितीनुसार, फिर्य़ादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU News) तत्वज्ञान विभागात पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. फुंदे समाज माध्यमातील ‘एसपीपीयू बॉईज हॉस्टेल ग्रुप’चा सदस्य आहे. आरोपी राम तरपडे याने गुरुवारी (दि.22) ‘रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी’ अशी राजकीय पोस्ट टाकली होती.ग्रुपवर राजकीय मजकूर प्रसारित न करण्याचा नियम घालून देण्यात आला होता. त्यामुळे फिर्य़ादी यांनी राजकीय पोस्ट डिलीट केली. याचा राग आल्याने आरोपी तरपडे फुंदेवर चिडला होता.

शुक्रवारी तरपडेने फुंदे याच्या मोबाईल क्रमांकवर फोन करुन त्याला विद्यापीठाच्या आवारात उपहारगृहाजवळ बोलावून घेतले. तरपडे याने शिवीगाळ करुन फुंदेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरपडे याच्यासोबत असलेले साथीदार वाकोडे, दिघा, काकडे यांनी त्याला प्लास्टीक खुर्ची फेकून मारली. मारहाणीत फुंदेला दुखापत झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव (API Sambhaji Gurav) करीत आहेत.

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Vidyapeeth Crime | व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेली राजकीय पोस्ट (Political Post On Whatsapp Group) डिलीट केल्याच्या रागातून सात आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील आदर्श कॅन्टीन (Adarsh Canteen Pune University) येथे घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीसंनी (Chaturshrungi Police Station) आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनिल भिमराव फुंदे (वय-28 रा. जुनी सांगवी, पिंपरी मुळ रा. वंजारवाडी, ता. जामखेड जि. नगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राम तरपडे, करण वाकोडे, वैभव दिघे, गणेश काकडे व त्यांच्या इतर तीन ते चार अनोळखी तरुणांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्य महितीनुसार, फिर्य़ादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU News) तत्वज्ञान विभागात पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. फुंदे समाज माध्यमातील ‘एसपीपीयू बॉईज हॉस्टेल ग्रुप’चा सदस्य आहे. आरोपी राम तरपडे याने गुरुवारी (दि.22) ‘रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी’ अशी राजकीय पोस्ट टाकली होती.ग्रुपवर राजकीय मजकूर प्रसारित न करण्याचा नियम घालून देण्यात आला होता. त्यामुळे फिर्य़ादी यांनी राजकीय पोस्ट डिलीट केली. याचा राग आल्याने आरोपी तरपडे फुंदेवर चिडला होता.

शुक्रवारी तरपडेने फुंदे याच्या मोबाईल क्रमांकवर फोन करुन त्याला विद्यापीठाच्या आवारात उपहारगृहाजवळ बोलावून घेतले. तरपडे याने शिवीगाळ करुन फुंदेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरपडे याच्यासोबत असलेले साथीदार वाकोडे, दिघा, काकडे यांनी त्याला प्लास्टीक खुर्ची फेकून मारली. मारहाणीत फुंदेला दुखापत झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव (API Sambhaji Gurav) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.