Mahalunge MIDC Police | पिंपरी : पिस्तुलाच्या धाकाने कामगाराला लुटणाऱ्या दोघांना अटक

Arrest
26th March 2024

पिंपरी : – Mahalunge MIDC Police | भाजी आणण्यासाठी जात असलेल्या कामगाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या (Robbery) दोघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 22 मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास खालुंब्रे गावातील पाण्याच्या टाकीजवळ घडली होती.

निखिल बोत्रे, प्रशांत बफन धर्मा लांडगे (रा. खराबवाडी ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रविण देवराव भांडारवाड याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. फिर्यादी प्रवीण हे भाजीपाला आणण्यासाठी खालुंब्रे बाजार पेठ येथे पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपींनी प्रवीण याला आडवून पैशांची मागणी केली. त्यावेळी फिर्य़ादी यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपी बोत्रे म्हणाला, तु मला ओळखत नाहीस का, असे म्हणत दोघांनी मारहाण केली. तसेच वरच्या खिशातील दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यावेळी प्रवीण याने आरडाओरडा केला असता आजुबाजुचे लोक मदतीसाठी आले. त्यावेळी बोत्रे याने खिशातून एक देशी पिस्टल काढून लोकांकडे रोखले. कोणी मध्ये आले तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन दहशत पसरवून पळून गेले.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना निखिल बोत्रे खालुंब्रे गावात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी बोत्रे याला ताब्यात घेऊन एक देशी पिस्टल व तीन काडतुसे तसेच दीड हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच त्याचा साथीदार प्रशांत बफन धर्मा लांडगे (रा. खराबवाडी ता. खेड) याला देखील अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे, जितेंद्र गिरनार, पोलीस अंमलदार राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, प्रकाश चाफळे, राजु जाधव, संतोष काळे, किशोर सांगळे, पवन वाजे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम, शेखर खराडे, अमोल वेताळ, सुप्रिया शिंदे यांच्या पथकाने केली.