Pune Fursungi Crime | पुणे : हँन्डलचा कट लागल्याने तरुणाला मारहाण, बेदम मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी

0

पुणे : – Pune Fursungi Crime | गाडीच्या हँन्डलचा कट लागल्याच्या कारणावरुन एका तरुणाला दगडाने दोन्ही डोळ्यांवर मारहाण केली (Marhan). या मारहाणीमुळे तरुणाचा उजवा डोळा कायमस्वरुपी निकामी होऊन त्याला दिसणे बंद झाले. हा प्रकार सोमवारी (दि.25) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी भागातील एस.पी बिअर शॉपी जवळ असलेल्या पानटपरी मध्ये घडला आहे. याप्रकरणी दोन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अविनाश तात्याबा गिते (वय-33 रा. हरपळेवस्ती, फुरसुंगी) यांनी बुधवारी (दि.27) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तरुणांवर आयपीसी 326, 324, 323, 504, 427, 34 गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी अविनाश गिते हे दुचाकीवरुन सिगारेट आणण्यासाठी जात होते. त्यावेळी गाडीचा हँन्डल हा पानटपरी जवळ थांबलेल्या एका तरुणाला लागला. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.

आरोपींनी गिते यांना शिवीगाळ करुन हाताने मारण्यास सुरुवात केली. एका आरोपीने फिर्यादी यांना दगडाने मारले. तर दुसऱ्याने डोक्याला तसचे दोन्ही डोळ्यांवर मारून गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत फिर्य़ादी यांचा उजवा डोळा कायमस्वरुपी निकामी झाला असून त्यांना दिसणे बंद झाले आहे. आरोपींसोबत झालेल्या झटापटीत फिर्य़ादी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन खाली पडून गाळ झाल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. अविनाश गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.