Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जमीन विकसनासाठी देण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची 50 लाखांची फसवणूक

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime | जमीन विकसनासाठी देण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची (Builder In Pimpri) 50 लाख रुपये घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार 20 मे 2021 रोजी भोंडवे वस्ती, रावेत (Bhondve Vasti Ravet) येथे घडला. याप्रकरणी रविवारी (दि. 24 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक हिरेनकुमार बाबुभाई पटेल (वय 38, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप शिवाजी भोंडवे Sandeep Shivaji Bhondve (रा. भोंडवे वस्ती, भोंडवे लॉन्स शेजारी, रावेत) यांच्या विरोधात आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप भोंडवे यांनी जमीन मालक गुलाब तुकाराम भोंडवे, सिताराम तुकाराम भोंडवे, दिवंगत साहेबराव तुकाराम भोंडवे यांचे वारस यांची रावेत येथे 118 गुंठे जमीन आहे. ही जमीन ज्वाईंट व्हेंचरद्वारे विकसन करण्यासाठी देतो असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून सिताराम तुकाराम भोंडवे व दिवंगत साहेबराव तुकाराम भोंडवे यांच्या वारसांना देण्यासाठी म्हणून समजूतीच्या करारनामा द्वारे डिपॉझिट म्हणून 50 लाख रुपये घेतले.

अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही ती रक्कम सिताराम तुकाराम भोंडवे व दिवंगत साहेबराव तुकाराम भोंडवे यांच्या वारसांना दिली नाही. तसेच फिर्यादी यांच्याशी या जागेचा विकसन करण्यासाठी विकसन करार करुन न देता फिर्य़ादी यांचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाटे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.