Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : तुला धंदा करायचा असेल तर हप्ता दे, दहशत पसरवणाऱ्या एकावर FIR

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime | मी मर्डरच्या (Murder Case) गुन्ह्यातून बाहेर आलो आहे. तुला धंदा करायचा असेल तर मला महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणी मागितली (Extortion Case). तसेच आजुबाजुच्या दुकानांवर दगडफेक करत दहशत पसरवली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) रात्री साडे आठ ते सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान साने चौकातील मोबाईल दुकानासमोर घडला.

याबाबत शुभम धनंजय नाकिल (वय-26 रा. आझाद चौक, निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बापु कांबळे याच्यावर आयपीसी 387, 504 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साने चौकात नेक्स्ट लेवल मोबाईल अॅक्सेसरीज नावाचे मोबाईल दुकान आहे. फिर्यादी दुकानात नसताना आरोपी दुकानात आला. त्याने फिर्यादी यांचा कामगार आदित्य काशिद याला मी मर्डर करून जेल मधून बाहेर आलोय धंदा करायचा असेल तर मला महिन्याला 5 हजार रुपये द्यावे लागतील म्हणत दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर दुकानाच्या शटरवर दगडफेक केली.

दरम्यान, फिर्यादी दुकानात आले असता आरोपीने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. तसेच फिर्यादी यांच्या दुकानाच्या आजुबाजच्या दुकानांवर दगड फेकुन मारुन मला जरकोणी हप्ता दिला नाही तर त्याला जीवे मारेन अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.