Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

0

पिंपरी : – Pimpri Cheating Fraud Case | बनावट फोटोच्या आधारे (Fake Photos) महिलेकडुन खंडणी (Extortion Case) उकळणाऱ्या आरोपीला अटक करुन 34 तोळे सोन्याचे दागिने निगडी पोलिसांनी (Nigdi Police) जप्त केले. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून नवी मुंबई येथील एका महिलेची 93 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन उर्फ सुरेश भिवशी कदम उर्फ द्रिश मालपाणी Suraj Laxman Parmar alias Suraj Jain alias Suresh Bhivshi Kadam alias Drish Malpani (वय-28 सध्या रा. संकेत पार्क, सय्यदनगर, पुणे मुळ रा. महाविर कॉलनी, विजापुर, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सुरज जैन नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पावून तीला एका मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचे भासवले.

महिलेसोबत मैत्री करुन तिला बाहेर भेटण्यास बोलावून घेत एकत्र फोटो काढले. त्यानंतर फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी महिलेला दिली. तसेच त्यांच्याकडून वारंवार एकूण 34 तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर पुन्हा दागिन्यांची मागणी त्याने केली. मात्र महिलेने दागिने देण्यास नकार दिला. तसेच महिलेला धमकावून तिच्या फेसबुकचा पासवर्ड घेतला. पासवर्डचा वापर करुन आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेचे फेसबुक अकाउंट उघडले. या अकाउंटवर दोघांचे एकत्र असलेले फोटो पोस्ट करुन महिलेची बदनामी केली. महिलेने तक्रार देताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपीने मैत्रीणीच्या नावाने विक्री केलेले 34 तोळ्याचे दागिने व महिलेचे मॉर्फ केलेले फोटो जप्त केले.

आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने अशा प्रकारे अनेक महिलांना फसवल्याचे समोर आले. त्याने यापुर्वी द्रिश मालपाणी या नावाने तो संगमनेर येथील मालपाणी कुटुंबातील सदस्य असल्याचे भासवून नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका महिलेला 93 लाखांची फसवणूक केली. याबाबत तुर्भे पोलीस ठाण्यात (Turbhe Midc Police Station) गुन्हा दाखल आहे. तसेच त्याला दत्तक घेणाऱ्या सोलापूर (Solapur) येथील एका महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने फेसबुक (Facebook), इंन्स्टाग्राम (Instagram) व इतर समाजमाध्यामाद्वारे अनेक महिलांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात संपर्क करावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे (Swapna Gore DCP) यांनी केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Vasant Pardeshi IPS), उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त राजू मोरे (Raju More ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी (PI Shatrughan Mali), पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम (Tejaswini Kadam PI), सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख (API API Ambrish Deshmukh), पोलीस उपनिरीक्षक महादेव यलमार (PSI Mahadev Yalmar), पोलीस अंमलदार भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे, शिवाजी नागरगोजे, सिद्राम बाबा, भूपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनील पवार, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.