Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : इमारतीत नसलेल्या फ्लॅटचा दस्त करुन विक्री, दांम्पत्याची 20 लाखांची फसवणूक

0

पिंपरी : – Pimpri Cheating Fraud Case | इमारतीत नसलेल्या फ्लॅटचा दस्त नोंदणी करुन एका दांम्पत्याची 19 लाख 97 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 31 मे 2016 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी दोन, हिंजवडी (Hinjewadi) येथे घडला आहे.

याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. शशिकांत बबन भिलारे (रा. भूगाव रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420, 465, 467, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा भिलारे याने विश्वास संपादन केला. त्यांना हिरा गार्डनच्या पाठीमागे हर्षवर्धन अपार्टमेंट मध्ये 101 हा फ्लॅट विक्री करण्याबाबत भिलारे याने व्यवहार केला. त्यानंतर भिलारे याने फिर्यादीकडून रोख आणि चेक द्वारे 19 लाख 97 हजा 712 रुपये घेतले. त्यानंतर त्या बांधकाम साईटमध्ये 105 नंबरचा फ्लॅट नसताना भिलारे याने त्याचा ड्राफ्ट तयार करून फ्लॅट नं.101 ऐवजी 105 हा विक्री करुन बनावट दस्त तयार करत फिर्यादीची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.

बँक मॅनेजर असल्याचे भासवून तरुणाची फसवणूक

पिंपरी : बँक मॅनेजर असल्याचे भासवून एका इंटरनेट सर्विसचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाची एक लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 29 मार्च रोजी रात्री सात ते आठ या दरम्यान चरोली खुर्द येथे घडला आहे. याप्रकरणी जालिंदर माणिक गावडे (वय-33 रा. चरोली खुर्द) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सायबर चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालींदर यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण बजाज फायनान्समध्ये मॅनजर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. बजाज फायनान्स कंपनीकडून आकर्षक ऑफर्स चालू असून तुमचे त्वरीत कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. कंर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी आणि सिक्युरिटी यासाठी एक लाख 10 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार जालिंदर यांनी पैसे भरले. मात्र, त्यानंतर त्यांना कर्ज न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके (PI Bhima Narke) करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.