Pune Kondhwa Crime | पुणे : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून 3 वाहनांची तोडफोड; कोंढवा बुद्रुक परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | बहिणीला पळवून नेऊन तिला लपवून ठेवल्याचा गैरसमज करुन चारजणांनी सोसायटीच्या पार्कींगमध्ये पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील साईनगर येथे 27 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रकाश बालाप्पा पुजारी (वय-50 रा. कमान पॅराडाईज सोसायटी, साईनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.29) फिर्याद दिली आहे. यावरुन मनोज चौधरी व त्याच्या दोन ते तीन मित्रांवर आयपीसी 452, 323, 427, 34, सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Kondhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज त्याच्या इतर दोन ते तीन मित्रांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीच्या बहिणीला पळवून नेऊन तिला लपवून ठेवल्याचा गैरसमज करुन घेऊन रागाच्या भरात फिर्यादी यांच्या कानशिलात लगावली. तसेच ढकलून देऊन दरवाजा लावुन घेतला. आरोपींनी तेथून जाताना त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने सोसायटीच्या पार्किंग मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. आरोपींनी तीन वाहनांची तोडफोड करुन पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.

Pune Market Yard Crime | तोतया ‘जीएसटी’ अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्याची लुट, मार्केट यार्ड परिसरातील प्रकार

Pune Lonikand Crime | पुणे : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करुन महिलेचा विनयभंग, विनयभंग करणाऱ्या पतीच्या मित्रावर FIR

Pune Hadapsar Crime | तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक, हडपसर भागातील प्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.