Pune Hadapsar Crime | तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक, हडपसर भागातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | पाठलाग करुन विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असताना पुन्हा चोरून तरुणीचा पाठलाग केला. तसेच तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून पुन्हा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका तरुणाला अटक केली आहे.

याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन वेदांत उद्धव झुंजुर (वय-23 रा. तुकाईदर्शन, हडपसर) याच्यावर आयपीसी 354(अ)(ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Hadapsar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी पीडित तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केला होता.
याप्रकरणी मुलीने फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच्यामध्ये कोणताही फरक पडला नाही.
त्याने वेळोवेळी फिर्यादी व तिच्या वडिलांना फोन केले. बुधवारी (दि.28) रात्री नऊच्या सुमारास सुमारास फिर्यादी घरी
जात असताना आरोपीने तिचा चोरून पाठलाग केला. तरुणी तिच्या राहत्या बिल्डींगजवळ आल्या असता आरोपी तिच्या पाठिमागे आला.

यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने तुमची मुलगी मला खुप आवडते,
मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. असे म्हणून मुलीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन
विनयभंग केला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे करीत आहेत.

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स, गुरूजी तालिम टायटन्स् संघ उपांत्य फेरीत

Leave A Reply

Your email address will not be published.