Kondhwa Pune Crime | येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या (Spot Video)

0

पुणे : Kondhwa Pune Crime | पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने येवलेवाडी (Yewalewadi Kondhwa) येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या Sinhgad College of Engineering (SCOE) वसतिगृहात गळफास (Hanging Case) घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Suicide Case)

अभिषेक प्रवीण शेळके (वय २२, रा. शिर्डी, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असलेल्या अभिषेकने मंगळवारी वसतिगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या का केली? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

सायंकाळी त्याचे मित्र परीक्षा देवून वसतिगृहात आले. त्यांनी दरवाजा वाजविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याची परीक्षा सुरु असल्याने काही विषय अवघड गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अभिषेक हा मूळचा शिर्डी येथील असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. या घटनेबाबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.