Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 13 जणांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही परतावा न देता 17 कोटी 35 लाखांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) एकावर एमपीआयडी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cheating Fraud Case)

याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन संदीपकुमार भगवानदास गुप्ता Sandeepkumar Bhagwandas Gupta (वय-35 रा. गणेशनगर, भिवंडी, ठाणे) याच्यावर आयपीसी 409, 420, 406 सह सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 पासून आजपर्यंत बिबवेवाडी येथील शुभ मॅनेजमेंट सर्व्हिसेस येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शुभ मॅनेजमेंट सर्व्हिसेस व स्विच पे सोल्युशन प्रा. लि. या दोन कंपन्या आहेत. या माध्यमातून पेमेंट एग्रीगेटर व रिसेलरचा व्यवसाय करतात. आरोपी गुप्ता याने फिर्यादी यांना कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. गुप्ता याने फिर्यादी यांच्यासह 13 जणांचा विश्वास संपादन केला.

आरोपी गुप्ता याने 13 जणांकडून 17 कोटी 35 लाख रुपये घेतले. सुरुवातीला काही दिवस गुंतवणुकीवर परतावा दिला.
मात्र, त्यानंतर परतावा दिला नाही. गुप्ता याने फिर्यादी यांच्यासह इतरांनी दिलेली रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरली.
तसेच एग्रीगेटर व्यवसाय न करता 13 जणांनी गुंतवलेली रक्कम तसेच परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके करीत आहेत.

Pune Minor Girl Rape Case | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Manohar Joshi Passed Away | माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन

Pune Crime News | दिघी येथील लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एकाला अटक (Video)

Pune Crime News | पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन, तर येरवडा पोलीस स्टेशन समोरून आरोपीने ठोकली धूम

Leave A Reply

Your email address will not be published.