Pune Lashkar Crime | पुणे : भररस्त्यात हात पकडून अल्पवयीन मुलीचा रोड रोमियोंकडून विनयभंग

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Lashkar Crime | शाळा सुटल्यानंतर पायी घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात हात पकडून विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) दुपारी तीनच्या सुमारास कॅम्प कॉलेज समोरील बाबाजान दर्गा चौकात घडला आहे. याप्रकरणी एका 20 ते 21 वर्षीय तरुणावर लष्कर पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय मुलीने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे.(Pune Lashkar Crime)
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर कॅम्प कॉलेज समोरील बाबाजान दर्गा चौकातून पायी घरी जात होती. त्यावेळी आरोपी चौकात थांबला होता. त्याने मुलीकडे पाहून शिट्टी मारली व तिचा हात पकडून मोबाईल नंबर मागितला. आरोपीने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन मुलीचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग
वारजे : डॉक्टर तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याचा प्रकार वारजे परिसरात घडला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.21) रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी राहत असलेल्या हॉस्टेल परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका 20 ते 22 वर्षीय अनोळखी तरुणावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 354, 354अ, 354ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Pune Minor Girl Rape Case | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना
Manohar Joshi Passed Away | माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन