Pune Vadgaon Sheri Crime | पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Vadgaon Sheri Crime | पुण्यातील वडगवा शेऱी येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. ही घटना गुरुवारी (दि.22) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडली आहे. पोलिसांनी आरोपी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 48 वर्षीय सावत्र बापावर आयपीसी 354, 354(अ), 323, 504 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलाचा सावत्र बाप आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगी अंघोळ करु किचनमध्ये कपडे बदल होती. त्यावेळी आरोपीने किचनचा दरवाजा वाजवून जेवण करायचे आहे सांगितले.(Pune Vadgaon Sheri Crime)
मुलीने कपडे बदलल्यानंतर दरवाजाची कडी काढून दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपीने किचनमध्ये येऊन पीडित मुलीला शिवीगाळ करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने आरडा ओरडा केला असता तिची आई व शेजारी घरात आले. आरोपीने मुलीला व तिच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागवडे करीत आहेत.
Pune Minor Girl Rape Case | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना
Manohar Joshi Passed Away | माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन