Pune Wagholi Crime | ‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Wagholi Crime | नवी घर शोधण्यासाठी गेलेल्या महिलेला ‘हा एरिया माझा आहे’ असे म्हणत पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री आठच्या सुमारास वाघोली परिसरातील खांदवेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी घडला आहे.
याबाबत ज्योती एकनाथ शेलार (वय-38 रा. राजराम पाटील नगर, खराडी, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन परशुराम शिवाजी पवार (वय-31 रा. खांदवेनगर, वाघोली, पुणे) याच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी ओळखीचे असून आरोपी कराटे शिक्षक आहे.(Pune Wagholi Crime)
फिर्यादी यांचा मुलगा व मुलगी आरोपीकडे कराटे प्रशिक्षणासाठी जात होते. मात्र, मागिल तीन ते चार महिन्यापासून ते आरोपीकडे जात नव्हते. मंगळवारी फिर्यादी त्यांच्या मुलीला घेऊन वाघोली परिसरातील खांदवेनगर येथे नवीन घर शोधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ‘हा एरिया माझा आहे’ असे म्हणून महिलेला प्लास्टीकच्या पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पत्नी व मुलाला काठीने मारहाण
लोणीकंद : बदनामी का करता अशी विचारणा केल्याच्या रागातून शिवीगाळ करुन पत्नी आणि मुलाला काठीने मारहाण
करुन बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोणीकंद परिसरातील जाधव वस्ती येथे मंगळवारी (दि.20) रात्री नऊच्या
सुमारास घडली. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार