Pune Pimpri Police News | ‘मॅट’ काय देणार निर्णय ! पुणे, पिंपरीतील पोलिसांचे लागले लक्ष; पोलीस दलातील बदल्यांमध्ये निवडणुक आयोगाचे निर्देश धाब्यावर?

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Police News | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावर पोलिस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या करताना निवडणुक आयोगाकडून जे निर्देश देण्यात आले होते. ते धाब्यावर बसविण्यात आल्याची चर्चा आहे. बदली झालेले काही पोलीस अधिकारी मॅट (Maharashtra Administrative Tribunal – Mat) मध्ये गेले. निवडणुक आयोग आणि मॅट यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, ठाणे येथील पोलीस अधिकारी मॅट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मॅट यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. (Pune Pimpri Police News)

निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलिस अधिकार्‍यांची तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिकचा कालावधी एका ठिकाणी झालेला असेल, त्यांची दुसर्‍या जिल्ह्यात बदली करावी, असे आयोगाने निर्देश दिले होते. त्यानुसार, प्रत्येक जिल्हा अधीक्षक व पोलीस आयुक्तालयाने आपल्याकडील अशा पोलीस अधिकार्‍यांच्या याद्या तयार केल्या. हे करताना पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, ठाणे या आयुक्तालयाने तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या साईड ब्रँचला बदली केली. पुणे पोलीस आयुक्तालयातील ५५ पोलीस निरीक्षकांचे तीन वर्षे पुणे जिल्ह्यात पूर्ण झाली आहेत.

त्याचवेळी ३२ पोलीस निरीक्षक यांचे पुणे हे होम टाऊन आहे. त्यामुळे यासर्वांची एकावेळी बदली करायची तर संपूर्ण यंत्रणा बदलली जाईल. हे लक्षात घेऊन या सर्व अधिकार्‍यांच्या साईड पोस्टिंगला बदल्या करण्यात आल्या. पिंपरी चिंचवडमधील २७ पोलीस अधिकार्‍यांच्या दुसर्‍या जिल्ह्यात बदली करण्यात आली. त्यापैकी १५ पोलीस अधिकारी मॅटमध्ये गेले. आमचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. निवडणुकीशी संबंधित पदांवर आम्ही कार्यरत नाही मग आमची बदली का म्हणून हा आमच्यावर अन्याय आहे, असे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यावर मॅटने पोलीस महासंचालक व मॅटकडे ज्या बदल्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत, तेथील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक निवडणुक आयोगाने घ्यावी, असे निर्देश मॅटने दिले. त्यानुसार मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी बैठक घेतली.

निवडणुक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले होते. असे असतानाही त्यानुसार बदल्या करण्यात आलेल्या नाहीत हे या बैठकीत लक्षात आले. या बदल्यांची छाननी करुन त्याचा अहवाल केंद्रीय निवडणुक आयोगाकडे राज्य निवडणुक आयोग पाठविणार आहे. दरम्यान, पोलीस महासंचालक कार्यालयाने बदल्यांबाबतचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय निवडणुक आयोगाला
द्यायचा होता. पण, मॅटच्या या प्रकरणामुळे हा अहवाल पाठविता आलेला नाही.

दुसरीकडे मॅट काय निर्णय घेते. त्याचवेळी निवडणुक आयोग या बदल्यांमध्ये दुसर्‍या जिल्ह्यातील बदल्याऐवजी साईड पोस्टिंगला मान्यता देते का यावर आता पुण्यासह पिंपरी चिंचवड, सोलापूर, ठाणे येथील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार का की त्यांना दिलेल्या साईड पोस्टिंगवर ते राहणार हे ठरणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात तब्बल ८८ पोलीस अधिकार्‍यांच्या निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु, या अधिकार्‍यांना साईड पोस्टिंग दिले. त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची वानवा झाल्याचे दिसत आहे.

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.