Supriya Sule On Ajit Pawar | तिसऱ्या वेळी बोलला, तर…, आई अन् नणंदेवरील टीकेवरुन खा. सुप्रिया सुळेंचा इशारा

बारामती : – Supriya Sule On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) यंदा अतीतटीची लढत होत आहे. भावजय आणि नणंद एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यानिमित्ताने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विविध गावात जाऊन सभा होऊ लागल्या आहेत. तसंच, एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हानेही दिले जात आहेत. यातच सुप्रिया सुळे यांनी आई आणि नणंदेवर झालेल्या टीकेवर संताप व्यक्त करत थेट इशारा दिला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या (Rohit Pawar) आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे (Sunanda Pawar). तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा, असा इशारा खासदार सुळे यांनी दिला आहे. सुप्रिया सुळे आई आणि नणंदेवर झालेल्या टीकेवर चांगल्याच संतापल्या आहेत.

…ते मी होऊ देणार नाही

काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. मी तुमच्यसाठी लढणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्या म्हणाल्या की, आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करु नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होतं असतो. कामे फक्त सत्तेत होतात असे नाही. दहा वर्ष विरोधात खासदार आहे. अनेक प्रकल्पात बारामतीचा पहिला क्रमांक लागतो. वाराणशीपेक्ष बारामती सगळ्यात पुढे असल्याचा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

माझा बाप थकला नाही

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, लोकं म्हणतात एका विचाराचा खासदार पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार होतं तरी गुजरातमध्ये शायनिंग झालं की नाही? विरोधात असले तरी कामे करता येतात. लोकांशी चांगले वागलं की कामे होतात. विरोधी पक्षात आल्यापासून जास्त टाळ्या आता मिळतात. माझा बाप थकला नाही श्रमलेला आहे. सुखाच्या काळात सोबत राहिलो तर रोहित आईसाठी करतोय तसा माझा मुलगा माझ्यासाठी करेल अशा आहे, माझी मुलगी गुणी आहे.