Shivsena UBT Group Vs Shivsena Eknath Shinde | ठाकरेंचा जिल्हाप्रमुख सुदैवाने बचावला, धावत्या कारवर जीवघेणा हल्ला, शिंदे गटाचे आमदार गोगावलेंच्या मुलावर आरोप

0

महाड : Shivsena UBT Group Vs Shivsena Eknath Shinde | रायगडमध्ये (Raigad Lok Sabha) उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. काल मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरदरम्यान नवगणे यांची कार धावत असताना दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये नवगणे बचावले असले तरी कार चालकाला किरकोळ जखमी झाली आहे. हा हल्ला एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले याने केल्याचा आरोप नवगणे यांनी केला आहे.

याबाबत माहिती देताना अनिल नवगणे यांनी सांगितले की, संध्याकाळी सात वाजता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचारसभा महाडमध्ये होती. सभा संपल्यानंतर एका लग्नाला उपस्थिती लावून महामार्गावरून परत येत असताना अचानकपणे वीर गावाजवळ समोरुन आलेल्या गाड्यांमध्ये बाटलीचा हल्ला ड्रायव्हरच्या बाजूने काचेवर करण्यात झाला.

दुसऱ्या बाजूने पंचवीस तीस जणांनी हल्ला केला. यामध्ये आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले स्वत: मला जिवे मारण्यासाठी तिथे आला होता. चालकाने परिस्थितीचे भान राखून कार वेगाने हल्लेखोरांमधून बाहेर काढली.

तोपर्यंत हल्लेखोरांनी माझी गाडी पूर्णपणे फोडली. माझे चालक आणि सोनावणे नावाचे सहकारी माझ्याबरोबर होते. मी माणगाव येथे आल्यानंतर तेथील पोलीस अधिक्षक स्वत: मला भेटायला आले होते.

नवगणे म्हणाले, आम्ही विकास गोगावले आणि त्याच्या पंचवीस-तीस लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मी स्वत: काचेतून विकास गोगावले यास पाहिले. तो फॉर्च्युनर गाडी घेऊन आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.