Pune Narhe Crime | ‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

Crime logo

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Narhe Crime | आम्ही येथील भाई आहोत असे म्हणत तीन ते चार जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन चाकी आणि चारचाक गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार नऱ्हे येथील सिंहगड कॉलेज समोरील सार्वजनिक रोडवर बुधवारी (दि.21) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत नाना बाबासो भुसे (वय-32 रा. वैष्णवी भवन, नरवसकर वस्ती, सिंहगड कॉलेज जवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तीन ते चार जणांवर आयपीसी 427, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी गाडी (एमएच 12 व्हीएफ 7834) रस्त्याच्या बाजुला पार्क केली होती. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जण दोन दुचाकीवरुन आले. त्यांनी जोर जोरात आरडा ओरडा करुन हाताली लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या गाडीची पाठीमागील काच फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या गाडीजवळ पार्क केलेली वैगनआर, स्विफ्ट, टेम्पो, दोन रिक्षांच्या काचा फोडून नुकसान केले.

वाहनांची तोडफोड केल्यानंतर, एका एकाला जीवंत सोडणार नाही असे म्हणून त्यांच्या हातातील लोखंडी रॉड हवेत फिरवत कोणी आमच्या नादाला लागु नका, आम्ही येथील भाई आहोत, असे म्हणून हातातील रॉड हवेत फिरवून दहशत पसरवुन शिवीगाळ करत दुचाकीवरुन पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड करीत आहेत.

Pune Wagholi Crime | ‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Pune Pimpri Police News | ‘मॅट’ काय देणार निर्णय ! पुणे, पिंपरीतील पोलिसांचे लागले लक्ष; पोलीस दलातील बदल्यांमध्ये निवडणुक आयोगाचे निर्देश धाब्यावर?

Pune Sadashiv Peth Crime | जिममधून 73 लाखांच्या किमती सामानाची चोरी, सदाशिव पेठेतील घटना