Amol Kolhe On Export | कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतकऱ्याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

0

काठापुर/शिरुर –  Amol Kolhe On Export | कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम केंद्र सरकारने केलं अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार (Sharad Pawar NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, दामु घोडे, अरुणा घोडे, स्वप्नील गायकवाड, रामदादा गावडे, गणेश जामदार आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसुन एका हाताने द्यायचे अन दुस-या हाताने काढुन घ्यायचे असे काम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Leave A Reply

Your email address will not be published.